Breaking News
Showing posts with label Event. Show all posts
Showing posts with label Event. Show all posts

उद्या विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे धरणे आंदोलन


अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटनाबाह्य दबावाचा जाहीर निषेध !
सकाळी १०.३० वा, ३१/०३/२०१५
उद्या विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे
“आदिवासी आरक्षण बचाव” धरणे आंदोलन होणार आहे. www.jago.adiyuva.in


Read more ...

Save Land, Save Adivasi, Save Nation!

जाहिर निषेध ! 

कोयना (सातारा) धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३५०किमी दूर वाडा (पालघर) येथील सुपीक जमिनीत आणि सुसरी (पालघर) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन ५३०किमी दूर लातूर च्या भूकंपग्रस्त आणि दुष्काळी जिल्ह्यात, हा कुठला न्याय? 

The tragic situation: Koyna(satara) dam grasthance rehabilitation in Wada (Palghar-350km away) which is fertile and rich area for water supply, needless to say it is great land for farming duties. Whereas Susari (Palghar) dam grasthance rehabilitation in Latur(530 km away) the place which is vulnerable for deadly earthquakes and droughts ! What kind of justice is this ! Throwing far away territory where life is critical than before, is this something they calls proper rehabilitation ?

Save Land, Save Adivasi, Save Nation!




Read more ...

संघटीत "बोगस आदिवासींचा" तीव्र निषेध !

उलगुलान
सवलती साठी घुसखोरी करू पाहणाऱ्या संघटीत बोगस आदिवासींचा तीव्र निषेध !
२/२/२०१५ राज्य भारातून मुख्यमंत्री यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना निवेदन सदर करून आदिवासी बचाव आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती. (निवेदन ची प्रत डाऊनलोड करावी)
आदिवासींची जमीन, पेसा, सांस्कृतिक ओळख, बौद्धिक संपदा, रोजगार, शिक्षण, सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे
Download format : https://drive.google.com/file/d/0B9DGQz4oA43gblVtcGFQYUpRWTlWQ0NlV1VaMTd1MzV5Vzhz/view?usp=sharing
 

Read more ...

आदिवासी समाजाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

आदिवासी समाजाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
रायगड जिल्ह्य़ातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. धनगर सामाजाला अनुसूचित जातीमध्ये सामाविष्ट करण्याच्या मागणीचा या वेळी निषेध करण्यात आला. सुमारे दहा हजार आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे. या मागणीसाठी महाराष्ट्रात धनगर समाजाने आंदोलन केले, परंतु धनगर समाजासअनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्यात आदिवासी समाजाचा विरोध आहे. आदिवासींचा विरोध दर्शविण्यासाठी रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटना, सह्य़ाद्री आदिवासी ठाकूर - ठाकर समाज कारती मंडळ, कोकण प्रदेश कोळी समिती यांच्या संयुक्त कृती समितीने मंगळवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
वेश्वी येथून हा मोर्चा निघाला. विविध घोषणांनी अलिबाग दणाणून सोडले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुमंत भागे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत अ. क्र. २६ वर ओरॉन, धनगड अशी नोंद आहे. धनगर ही जात अनुसूचित जमातीमध्ये नाही. धनगर समाजाचा भटक्या जमातीच्या यादीत समावेश आहे. धनगर व धनगड या दोन्ही जाती पूर्णपणे वेगळय़ा आहेत. धनगर समाजाचा तसेच आदिवासी समाजाचा दुरान्वयानेदेखील संबंध नाही. त्यामुळे धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून घेण्यास आमचा विरोध आहे, असे संयुक्त कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे.
रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक, सह्य़ाद्री आदिवासी ठाकूर - ठाकर समाज कारती मंडळाचे अध्यक्ष मनोहर पादीर, कोकण प्रदेश कोळी समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर, कमलाकर इलम, ए. टी. वाघमारे, सागर नाईक, एकनाथ वाघे, दत्ता नाईक, शरद वरसोलकर, रखाताई वाघमारे, गुलाबताई वाघमारे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी आदिवासी, डोंगरकोळी आणि महादेव कोळी यांना जातीच्या दाखल्यासाठी १९५० पूर्वीच्या पुराव्याची अट शिथिल करावी. आदिवासी समाजाला अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ केली जावी, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व्हावी, आदिवासी वाडय़ा रस्त्याने जोडल्या जाव्यात इत्यादी मागण्या करण्यात आल्या

Read more ...

आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

जय आदिवासी
जय बिरसा मित्रंनो दि . 17-08-2014 रोजी परभणी येथे झालेल्या दगडफेकीमुळे वसतीगृहातील आदिवासी विद्यार्थांना पोलीसांच्या दडपशाहीखाली अटक करण्यात आली. याची नोंद कळताच जिंतुर मधील आदिवासी कार्यकर्तेनी परभणी गाठली.
आज कॅमुनिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.राजन क्ष्रीसागर , डाॅ .संतोष टारफे, डाॅ.सतीष पाचपुते आदिवासी संघटक व कार्यकर्ते उपस्थीत होते, यांनी आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

D.D. Shelke


Read more ...

उमराखेडचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार !


उमराखेडचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार !
उमरखेड येथे २०/८/१४ ला भव्य आदिवासी मोर्चा निघणार आहे. आणि या मोर्च्याचे एक खास वैशिष्ट्ये राहणार आहे. या मोर्च्याची बातमी ऐकून शरद पवार थंडगार होणार नाही तर नवलच ! १५ हजार लोकं एक खास ऐटम या मोर्च्यात करणार आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व मिडिया २० तारखेला उमरखेड येथे जमा होणार आहेत. या तारखेला जिथे जिथे मोर्चे असतील तिथल्या आयोजकांनी मला फोन करून या विषयी विचारावे आणि तसाच ऐटम तिथे करावे. ह्यामुळे आपल्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार आहे.आणि मतांचे राजकारण करणा-या नेत्याच्या बुडाला मिराच्या लागणार आहेत.तसेच मी जे काही सांगितले ते मोर्चा होईपर्यंत गोपनीय ठेवयाचे ह्याची नोंद .माझा फोन न ९४०५७०८७३७, - 
Madhav Sarkunde

Read more ...

मा. आमदार वसंतराव पुरके यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा

मा. आमदार वसंतराव पुरके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर अस्सल आदिवासी समाज बांधवांचा भव्य मोर्चा
दि. 11 आॅगस्ट 2014 रोजी सकाळी वाजतापासुन
कारला चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा
विनित : आदिवासी संघर्ष कृती समिती, वर्धा
Read more ...

चला,मित्रांनो पुन्हा एकदा...मुंबई..

चला,मित्रांनो पुन्हा एकदा...मुंबई..सोमवार सुट्टी काढा . आपले आणि आपल्या भावा-बहिनिंच्या आरक्षणाचे रक्षण करायची जबाबदारी आपलीच आहे.त्याचे भविष्य बोगस आणि सत्तेचा माज असलेली माणसं लुटू पाहत आहेत.कोण राखील.नोकरदार आदिवास्यांनो लय झाले आता जर तुम्ही आले नाहीत तर उद्याची पिढी तुम्हाला शिव्या तर देयीलाच पण आता तुमच्याविरुद्धाही मोर्चा काढावा लागेल.माळीन दुर्घटना होऊनसुद्धा धनगरांनी मोर्चा काढला.एक सामाजिक जाणीव म्हणून किंवा दुखात सामील व्हाव अस वाटल नाही नालायकांना.यातूनच त्यांनी सिद्ध करून दाखवल कि ते आदिवासी नाहीत कारण आदिवासी दुसऱ्याच्या दु:खाला स्वतःचे दुख: समजतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे.चला पुन्हा एकदा एकत्र येवू या.जय आदिवासी... यशोदा प्रतिष्ठाण

Read more ...

आळेफाटा येथे ख-या आदिवासींचा रास्ता रोको

_धनगर_आरक्षण_विरोध
मंगळवार दि.5/08/2014 रोजी आळेफाटा येथे
ख-या आदिवासींचा रास्ता रोको आंदोलन आहे,
तरी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.
व इतरांनाही सांगावे.
स्थळ : आळेफाटा
दिनांक : 5/08/2014
वेळ : सकाळी 10 वाजता.
प्रतिक नानासाहेब तिटकारे-पाटील


Read more ...

चलो शहापुर.. सोमवार दि.०४/०८/२०१४

चलो शहापुर.. चलो शहापुर.. चलो शहापुर..
सोमवार दि.०४/०८/२०१४
रोजी सकाळी १०.०० वा.मुंबई - नासिक
महामार्ग,आसनगाव येथे
रास्ता रोको ( चक्का जाम)
वाट चुकली असेल तर
वाट दाखवू आणि वाटेला गेला तर वाटोळं करू
त्यासाठी वाटेल ते करू....
कृपया, आदिवासीच्या नादी लागु नका....
ही धनगर समाजाला विंनती आहे...
धनगर समाजाला पाहिजेच असेल तर
त्यांनी त्यांच्यासाठी वेगळे आरक्षण
शासनाकडे मागावे...... आमच्या ताटातलं
हिसकवण्याचा प्रयत्न करू नये.....
जागे व्हा, उठा! हजारोच्या संख्येने सामील
व्हा आणि विरोध करा...
आदिवासी घुसखोरी थांबवा....हि नम्र
विनंती. ... आदिवासी आरक्षण बचाव
कृती समिति शहापुर जि. ठाणे

Read more ...

सोमवार दि.४-८-२०१४ रोजी नंदूरबार

सोमवार दि.४-८-२०१४ रोजी नंदूरबार येथे धनगर समाजाला आदिवासी मध्ये समावेश करू नये, या साठी निषेध मोर्चा आयोजित केला आहे.तरी महाराष्ट्रातील लाखो आदिवासी प्रेमीनी उपस्तीत राहावे ही कळकळीची विनंती.आदिवासी एेक्याचा विजय असो

Read more ...

Nashilk Andolan 2013

Read more ...
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti