Breaking News
Showing posts with label Students. Show all posts
Showing posts with label Students. Show all posts

अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?

अरे आदिवासी बांधवानो अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?
राजकारण हे एक साधन आहे शासन चालवण्या साठी, आणि राजकीय पक्ष एक घटक. राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी हित जपण्या साठी त्यांना जमेल त्या मार्गाने जो पक्ष विचार धारा आवडेल त्या मार्गाने प्रयत्न करावे आणि ज्यांना आवडेल त्यांनी सहकार्य करावे. आदिवासी हित जपणे हे आपले धेय्य आणि उदिष्ट असताना पक्ष/नेते/विचारधारा यांच्या नावाने आपले विभाजन का करावे ना?

एक आदिवासी म्हणून सगळ्यांना एक विनंती, आपल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्तित्व साठी प्रामाणिक नेतृत्व निवडून दया. (एक संवेधानिक प्रथा म्हणून)… अन्यथा हजारो वर्ष पासून आपल्या आदिवासी समाजात परंपरेने असलेली लोकशाही जगाला आदर्श शिकवणारी आहे. तेथे सगळेच समान असतात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येते. न वयाची मर्यादा न जाती पातीची, सर्व समावेशाक आणि पारदर्शक म्हणून जगातील अनेक नामवंत आणि यशस्वी उद्योग समूह याचा अवलंब करीत आहेत. आणि दुर्दैवाने आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आदिवासींना राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजातील एकात्मता नष्ट करू पाहत आहेत.

आयुश (आदिवासी युवा शक्ती) परिवार कडून सगळ्यांना विनंती आहे आपले जे राजकीय विचार असतील ते ठेवा पण आपण आदिवासी समाज एक कुटुंब आहोत हि भावना जतन करूया !

 www.jago.adiyuva.in
Read more ...

आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

जय आदिवासी
जय बिरसा मित्रंनो दि . 17-08-2014 रोजी परभणी येथे झालेल्या दगडफेकीमुळे वसतीगृहातील आदिवासी विद्यार्थांना पोलीसांच्या दडपशाहीखाली अटक करण्यात आली. याची नोंद कळताच जिंतुर मधील आदिवासी कार्यकर्तेनी परभणी गाठली.
आज कॅमुनिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.राजन क्ष्रीसागर , डाॅ .संतोष टारफे, डाॅ.सतीष पाचपुते आदिवासी संघटक व कार्यकर्ते उपस्थीत होते, यांनी आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

D.D. Shelke


Read more ...

आरक्षणविरोधाची अजितदादांना धग

धुळे : नंदुरबारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोमवारी स्थानिक आदिवासींचा रोष सहन करावा लागला. धनगर समाजाला अनुसूचित जामातीत आरक्षण देण्याला विरोध करत आदिवासी बांधवांनी अजित पवारांची गाडी १५ मिनिटे रोखून धरली. पोलिसांना बळाचा वापर करत पवारांना मार्ग मोकळा करून द्यावा लागला. 

राष्ट्रवादीतर्फे नंदुबारमधील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी पवार आले असता, आदिवासी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्यासाठी नंदुरबार-धुळे चौफुलीवर गर्दी केली होती. या ठिकाणी पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले. त्यानंतर गाड्यांचा ताफा मार्गस्थ झाला. मात्र, थोड्याच वेळात आंदोलकांनी नवापूर चौफुलीवर पवारांच्या गाड्यांचा ताफा रोखून धरत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

Read more ...
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti