Breaking News
Showing posts with label Scheduled Tribes. Show all posts
Showing posts with label Scheduled Tribes. Show all posts

Save Land, Save Adivasi, Save Nation!

जाहिर निषेध ! 

कोयना (सातारा) धरणग्रस्तांचे पुनर्वसन ३५०किमी दूर वाडा (पालघर) येथील सुपीक जमिनीत आणि सुसरी (पालघर) येथील धरणग्रस्तांचे पुनर्वसन ५३०किमी दूर लातूर च्या भूकंपग्रस्त आणि दुष्काळी जिल्ह्यात, हा कुठला न्याय? 

The tragic situation: Koyna(satara) dam grasthance rehabilitation in Wada (Palghar-350km away) which is fertile and rich area for water supply, needless to say it is great land for farming duties. Whereas Susari (Palghar) dam grasthance rehabilitation in Latur(530 km away) the place which is vulnerable for deadly earthquakes and droughts ! What kind of justice is this ! Throwing far away territory where life is critical than before, is this something they calls proper rehabilitation ?

Save Land, Save Adivasi, Save Nation!




Read more ...

Save tribal save nation!

  :तालुक्यातील २५ गावे आदिवासी क्षेत्रातून वगळण्यात आली आहेत. वास्तविक या गावांमध्ये ९८ टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आदिवासींची आहे. असे असताना ही गावे वगळल्याच्या निषेधार्थ डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हजारो आदिवासी या मोर्चात सहभागी झाले होते.
नंदुरबार तालुक्यातील हजारो आदिवासी दुपारी महाराणा प्रताप चौकात जमले होते. तेथून त्यांनी मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे जिल्हाधिकार्‍याना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जून २0१४च्या राजपत्रात नंदुरबार तहसील अनुसूचित क्षेत्र जाहीर केले आहे. त्यात जाहीर करण्यात आलेल्या गाव, पाडे, वस्त्या यानुसार आदिवासी उपयोजना क्षेत्रात नंदुरबार तालुक्यात ९७ ग्रामपंचायती, १0७ गावे समाविष्ट असून राजपत्रात फक्त ८२गावांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित २५ गावे समाविष्ट नाहीत. यामुळे विशेष अधिकाराच्या लाभापासून आदिवासी नागरिक, सुशिक्षित बेरोजगार तरुण वंचित राहणार आहेत. शासन निर्णयानुसार माडा, मिनीमाडा, आदिवासी उपयोजना क्षेत्र हे अनुसूचित क्षेत्र ठरविण्यात आले आहे. वास्तविक वगळण्यात आलेल्या या गावपाड्यांमध्ये ९७ ते १00टक्के आदिवासी जनता राहते. या निर्णयामुळे सुशिक्षित आदिवासी तरुणांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीवरही टाच आली आहे. त्यामुळे आदिवासी बेरोजगारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या सर्व बाबींचा विचार व्हावा याबाबत शासनाकडे वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून पुन्हा या गावांना आदिवासी योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मोर्चाचे नेतृत्व डोंगर्‍यादेव माऊली संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव गांगुर्डे, आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी या�
: Ha tar ghor Anyay haye:  आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी यांनी केले. या वेळी राजेंद्र पवार, रमेश गावीत, धरमदास बागुल, भरत बागुल, दत्तू चौरे, देवमन चौरे, देवमन पवार, शत्रुघ्न गांगुर्डे, पूनम बागुल, सोमा गांगुर्डे, उत्तम चौरे, रामलाल बागुल आदींसह हजारो आदिवासी युवक व नागरिक सहभागी झाले होते.

■ नंदुरबार तालुक्यातील देवपूर, भवानीपाडा, निमगाव, पिंप्री, वडगाव, बालआमराई, काळंबा, पाचोराबारी, सोनगीर, सुतारे, अंबापूर, हरिपूर, नवागाव, श्रीरामपूर, अजेपूर, घोगळगाव, गंगापूर, तारापूर, राजापूर, ईसाईनगर, शिवपूर, नंदपूर, मालपूर, वागशेपा, उमरगाव, चौपाळे, नांदर्खेपैकी टाकळीपाडा, वाघाळेपैकी काळटोमी या गावांचा समावेश आहे. या गावांना वगळले

Read more ...

कोवळी पानगळ गळतेच आहे…- कुसूम भोईर

कोवळी पानगळ गळतेच आहे…

By  on August 17, 2014
0
feature size
सध्या धनगर आरक्षणाचा विषय गाजतोय. धनगर समाजाचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत, पण त्यांची ही मागणी पूर्णतः॒चुकीची आहे. वारंवार मागणी करूनही त्यांना आदिवासींचा दर्जा मिळालेला नाही. कारण त्यात काहीच तथ्य नाही. धनगर समाजाला अपुर्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे वेठीला धरलं जातंय. जे मान्यच होणार नाही त्यासाठी लढवलं जातंय. यात निव्वळ राजकीय स्वार्थ आहे. काही धनगर नेते स्वतःच्या राजकीय कारकिर्दीसाठी समाजाला फसवतायत, असंच चित्र सध्या आहे. तसंच सर्वच पक्षांचे राजकारणी धनगरांना॒आश्वासनं देत सुटलेत की, आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला आरक्षण देऊ…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी॒आश्वासनांची खैरात वाटणं सुरू केलंय. त्यातूनच आज हा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर आणला गेलाय. मराठ्यांना आरक्षण दिलं. आता धनगर सरसावलेत. त्यांनी तर थेट आदिवासींच्या ७ टक्के आरक्षणातच वाटा मागितलाय.॒धनगर समाजाची ही मागणी पूर्णतः चुकीची आहे. आरक्षणासाठी दांडगाई करून, मंत्र्यांची अडवणूक करून, शाईसम रसायन मंत्र्यांच्या अंगावर टाकायलाही कमी केलं गेलं नाही. ही कृत्य करणारा समाज आदिवासी असूच शकत नाही. मुळात आदिवासी कसा आणि कोण आहे? आदिम काळापासून वास्तव्यास असलेला तो आदिवासी अशी व्याख्या आदिवासींची केली जाते. अतिदुर्गम भागात आदिवासींचं वास्तव्य असतं. शहरी जीवनाशी त्याचा लवकर संपर्क न आल्यामुळे तो मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. त्याच्यात कोणताही बदल झाला नाही. इंग्रजीत ‘अॅम्बॉरिजिनीझ्’ हा आदिवासीसाठी पर्यायी शब्द आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. झाडं, पशू यांची तो पूजा करत असतो. आदिवासींच्या प्रत्येक गावात वाघोबाचं मंदिर (ठाणे, पुणे जिल्ह्यात)॒असतं. त्याची पूजा केली जाते. आदिवासी तसा आत्ममग्न समाज म्हणावा लागेल. कोणाच्या वाटेला न जाणं. निसर्गात जे मिळेल त्यावर गुजराण करणं, अशी त्याची जीवनपद्धती… आदिवासी समाजात शेती केली जाते पण ती फारच थोडी असते. त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार छोटे उद्योग केले जातात. उदाहरणार्थ, जंगलातून वनौषधी गोळा करून विकणं, पण यात गोम अशी आहे की, आदिवासीला गंडवून कमीतकमी किमतीत त्याच्याकडून या मौल्यवान वनौषधी खरेदी करायच्या आणि त्या जास्तीतजास्त किमतीला विकून॒आपल्या तुंबड्या भरायच्या असा दलालांचा उद्योग वर्षानुवर्षं सुरू आहे. आपण फसवलं जातोय याचं आदिवासीला भानच नाही. किंबहुना तो आत्मसंतुष्ट असतो. जेवढं मिळालंय तेवढं घ्या, याच त्याच्या स्वभावाचा फायदा धनदांडगे आजवर घेत आलेले आहेत. जंगलतोडीचा दोष बर्याचदा आदिवासींवर लावला जातो. खरंतर हा आदिवासी वनविभागाच्या माळ्याला (वनकर्मचारी) जितका घाबरतो तितका तो वाघालाही घाबरत नसेल, हे वास्तव आहे. मग हा नाहक दोष त्याच्या माथी का मारला जातो? ज्या सागाच्या पानाचा उपयोग करून तो घर बांधतो, त्याची मनोभावे पूजासुद्धा करतो असं असताना त्यालाच दोषी ठरवून आपले गुन्हे शाबूत ठेवण्याचं काम बदमाश लोकांकडून होत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे. आदिवासींच्या डोळ्यांसमोर त्यांचं विश्व उद्ध्वस्त होतंय आणि मूकपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काहीच नाही…
रूढीपरंपरा जपणारा हा समाज… त्याची संस्कृती त्यामुळेच भिन्न आहे. आदिवासी समाजात परंपरेला महत्त्वाचं स्थान आहे. एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे या परंपरा सोपवल्या जातात. त्यात नृत्य, गायन, कथा, काव्य या कलांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकजीनसीपणा आढळतो. आदिवासींमध्ये॒अंधश्रद्धेचं प्रमाणही खूप आहे. मांत्रिक, भगत, जादूटोणा यांच्या विळख्यात तो अजूनही अडकून पडलेला आहे. त्यांच्या या अंधश्रद्धेचा फायदाही घेतला जातो, त्याला नागवलं जातं. या अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून आदिवासीला बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे. नाही म्हणायला काही समाजसुधारकांनी तसे प्रयत्न केले आहेत. उदाहरणार्थ, बाबा आमटे दाम्पत्य आणि संपूर्ण आमटे कुटुंबीय, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे, डॉ. अभय-राणी बंग… डॉ. अभय बंग यांनी तर त्यांचं संशोधन सरकारला सादर केलंय. पण काही उपाययोजना सुचवून सरकार ढिम्म… काहीही केलेलं नाही यावर सरकारने… ‘कोवळी पानगळ’ गळतेच आहे. मेधा पाटकरांनी नर्मदा खोर्यातील आदिवासींसाठी काम केलं. त्या सरदार सरोवराची उंची वाढवू नये म्हणून आदिवासींना घेऊन पाण्यात उभ्या राहत असत… पण काय झालं? मोदींनी त्यांना हवं ते करून घेतलं आणि आदिवासींना लावलं देशोधडीला… ज्या डोंगराळ भागात आदिवासी राहतो, त्याच भागात शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं बांधली जातात. मग त्याला विस्थापित व्हावं लागतं. आपलं गाव सोडून जावं लागतं. किती यातना होत असतील त्याच्या मनाला… हा आदिवासी इतर बंधू-भगिनींना पाणी मिळावं म्हणून स्वतःच्या मातृभूमीचा त्याग करतो. पण कोणी ठेवतं का त्याच्या त्यागाची जाणीव? उलट आदिवासी म्हटलं की लोकांच्या डोळ्यांसमोर उघडा-वागडा,॒रापलेला चेहरा येतो, कधी तर कुचेष्टेनेही पाहिलं जातं त्याच्याकडे… बुजरेपणामुळेही तो इतर समाजापासून तुटलेला आहे. मात्र आताशा काही प्रमाणात हा आदिवासी समाज शिकू लागला आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत याचं प्रमाण अधिक म्हणता येईल, पण गडचिरोली, चंद्रपूर इथे आजही भयानक परिस्थिती आहे. नक्षलवादाच्या विळख्यात आदिवासी सापडलेला आहे. सुरुवातीला सरकारच्या अन्यायी॒वागणुकीच्या विरोधात आदिवासीला नक्षलवादी बनवलं आणि आता वार्यावर सोडून दिलंय. किती निष्पाप आदिवासी मारले गेले आहेत.॒सरकार आणि नक्षलवाद्यांच्या धुमश्चक्रीत॒त्याची काही मोजदादच नाही. उपजिविकेसाठी आदिवासी शेती करतो ती अतिशय तुटपुंजी असते.॒त्यावरच त्याची वर्षभराची गुजराण होते. आदिवासी तसा काटक, मेहनती पण बुजरा… त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या कलेचं, मेहनतीचं चीज होत नाही. त्याची कला कड्याकपारीत गोठून राहिलीय. ती जगापुढे आली नाही. शिक्षणाच्याबाबतीतही या वर्गाच्या बाबतीत खूप औदासीन्य आहे. ते जिथे राहतात तिथे शाळा असल्या तरी त्यांची गुणवत्ता काय असेल हे वेगळं सांगायला नको. आश्रमशाळा असतात त्यांच्या मुलांसाठी पण त्यांची गत जगजाहीर आहेच…
तसं पाहिलं तर आदिवासींना चांगल्याप्रकारे संविधानिक संरक्षण आहे. त्यात शिक्षण, राजकीय आरक्षण तसंच अन्यही अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे. सोयीसवलती आहेत… आणि याच गोष्टींवर डोळा ठेवून धनगर आणि आता बंजारा समाजही आरक्षणासारखी मागणी करू लागले आहेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची (Scheduled Tribes) यादी अधिसूचित केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४७ जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती किंवा गट यांचा समावेश करण्यात आला आहे यात…
१) आंध
२) बैगा
३) बरडा
४) बावचा, बामेचा
५) भेना
६) भारिआ भुमिआ, भुईनहर भमिआ पांडो
७) भात्तरा
८) भिल्ल, भिल्ल गरासिआ, मेवासी भिल्ल, धोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, डुंगरी गरासिआ, रावळ भिल्ल, तडवी भिल्ल, भगलिआ, भिलाला, पावरा, वसावा, वसावे
९) भुंजिआ
१०) बिन्शवार
११) बिरहूल, बिरहोर
१२) चौघरा
१३) धनका, तडवी, तेटारीआ, वळवी
१४) धानवार
१५) धोडिआ
१६) दुबळा, तलावीआ, हतपती
१७) गामीत, गामता, गापीड, मावची, पाडवी
१८) गोंड, राजगोंड, अरख, अराख, अगारिआ, असूर, बदी, भरिआ, बडा मारिआ, भटोला, भिम्मा, भुटा, कोईलाभुटा, कोईलाभुटी, भार, मारिआ, छोटामारिआ, दंडामी, धुरूधुरवा, धोबा, धुलिआ, दोरला, गैकी, गट्टा, गट्टी, गैता, गौड गोवारी, हील, कांद्रा, कालंगा, खटोला, कोईतर, कोया, खिरवार, कुचा, कुचकी, माडिआ, माना, मन्नेवार, मोघ्या, मोगीआ, मुडिआ, मुरिआ, नागरची, नाईकमोड, नागवंशी, ओझा, राज, शरेका, थाटिआ, थोट्या, वाडे, वडेमारिआ
१९) हलबा, हलबी
२०) कमार
२१) कामोठी, कातकरी, ढोर काठोडी, ढोर कातकरी, सोन काठोडी, सोन कातकरी,
२२) कवारस, कनवार, कौर, चेरवा, राठीआ, तनवार, छत्री
२३) खैरवार
२४) खारिआ
२५) कोकणा, कोकणी, कुकणा
२६) कोल
२७) कोलम, मन्नेवारलू
२८) कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा.
२९) कोळी महादेव, डोंगर कोळी
३०) कोळी मल्हार
३१) कोंध, खोंड, कांध
३२) बोरकु, बोपची, मौआशी, निहाल, नाहूर, बोंधी, बोदेआ
३३) कोया, भिने कोया, राज कोया
३४) नागेशिआ, नागिशीआ
३५) नाईकडा, नायका, चोलीवाला नायका, कपाडिआ नायका, मोटा नायका, नाना नायका,
३६) ओरान, धांगड
३७) परधाम, पाथरी, सारोटी
३८) पारधी, अडवी चिंचेर, फणस पारधी, फासे पारधी, लांगोली पारधी, बहेलीआ, चिता पारधी, शिकारी, टाकनर, टाकीआ
३९) पारजा
४०) पटेलिआ
४१) पोमला
४२) राठवा
४३) सवार, सवारा
४४) ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, का ठाकर, मा ठाकर
४५) थोटी
४६) वारली
४७) विटालीआ, कोतवालिआ, बरेडिआ
उपरोक्त आदिवासींच्या जातिंमध्ये कुठेही धनगर जातिचा उल्लेख नाही. ज्या धांगड जमातिचा दाखला धनगर समाजाचे नेते देत आहेत ती ओरान या जमातीची उपजमात आहे. नाम साधर्म्याचा फायदा घेऊन आंदोलनं मोर्चे काढले जातायत. जेव्हा एखाद्या जमातीला आदिवासीचा दर्जा दिला जातो तेव्हा त्या जमातीच्या सांस्कृतिक आणि व्यक्ती वैशिष्ट्यांची दखल घेतली जाते आणि ही वैशिष्ट्यं आदिवासी संशोधन समिती आणि मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण सिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने (T A C) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही. याच कारणास्तव धनगरांनी केंद्र सरकारकडे केलेले आदिवासींमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठीचे प्रस्ताव स्वीकारले गेलेले नाहीत. तरीही आताची आंदोलनं आणि बाकीच्या कुरापती सुरूच आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा/गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणं, त्यात दुरुस्ती करणं किंवा एखाद्या गटास/उपगटास वगळण्याचा अधिकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे. कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला तो अधिकार नाही. राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही. या गोष्टींचा अभ्यास न करता एखाद्या समाजाला कसं गंडवलं जातं याचंच हे उदाहरण आहे. आधी ओबीसींमध्ये नंतर एन टी प्रवर्गात समावेश असताना अजून एस टी या प्रवर्गातच यांना कशाला घुसायचं आहे. तर त्यालाही कारण आहेच… आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे अनुशेष राहतो. त्या अनुशेषावर या धनगर समाजाच्या नेत्यांचा डोळा आहे. त्यासाठीच हा एवढा सगळा खटाटोप चाललेला आहे. पण आता आदिवासी जागा होतोय. तो हे सर्व होऊ देणार नाही. आपल्याला महाभारतातील अंगठा कापून देणारा एकलव्य, भिल्ल माहीत असेल, इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणारा तंट्या भिल्ल पण माहीत असेल. मात्र शांत समजला जाणारा हा समाज एकदा पेटून उठला की त्याला आवरणं कठीण जाईल हेही तितकंच खरंय… जे आदिवासींचं आहे ते त्यांचंच राहावं, त्यात वाटेकरी होऊ नये. आधीच त्यांच्याकडचं, त्याचं असलेलं येनकेनप्रकारे ओरबाडलं गेलंय. त्यात अजून धनगर समाजाची भर नको. धनगर समाजाची मागणी घटनाबाह्यच आहे. त्यामुळे त्यांनी दुसर्या कुठल्या मार्गाकडे जावं, आदिवासींच्या ताटातला घास हिसकावून घेऊ नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता आदिवासींमधून उमटू लागल्या आहेत. ही या दोन्ही समाजातील वादंगाची नांदी ठरू नये, एवढीच अपेक्षा…!
- कुसूम भोईर
Read more ...

केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे - Madhav Sarkunde

केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे.
धनगर आदिवासी नसून ते क्षत्रिय आहेत.१९११ साली अजमेर येथ हिंदू महासभेची मिटिंग झाली त्यामध्ये धनगर हे क्षत्रिय आहेत असा निर्णय धर्ममार्तंडानी दिला. धनगर हे पशुपालक आणि मेशपालक आहेत त्यांनी काढलेल्य गायींच्या दुधानी आर्या अभिषेक करत होते. या उलट शतपथ ब्राह्मण या ग्रंथात शुद्राचे म्हणजे अनार्याच्या हातचे (आदिवासीच्या हातचे) दुध अभिषेकासाठी अपवित्र मानल्या जात असे.ह्याचाच अर्थ असा कि धनगर आणि आदिवासी हे दोन वेगळे समाज समूह आहेत वेगळे आहेत. धनगर क्षत्रिय असल्यामुळे त्यांचे व आर्यांचे चांगलेच पाटत होते.
धनगर आर्य धर्म व्यवस्थेला मानणारे आहेत. म्हणूनच धनगर आर्यच्या देवदेवतांना मानतात. पंढरपुरचे विठोबाचे मंदिर विष्णू वर्धन ह्याने बांधले आहे.तो धनगर होता. पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर हिने हजारो हिंदू देवदेवतांचे मंदीरं बांधली. ह्यावरून ते वैदिक परंपरेला मानणा-या होत्या हे शिद्ध होते .तसेच त्या अत्यंत सधन होत्या हेही दिसून येत.
या उलट सर्व आदिवासी अनार्य असून ते अवैदिक परंपरेतील आहेत.आदिवासींनी कोणत्याच वैदिक देवतांचे मंदिर उभारले नाही. मुसलमान राजवटी धनगर समाजाचे राज्य गेल्यामुळे ते पठारावर मेंढ्या पालनाचा व्यवसाय करू लागले. धनगर हे समाजशात्र, मानववंशशात्र , धर्मशात्र , इतिहास इत्यादीच्या कसोटीवर आदिवासी म्हणून सिद्धच होऊ शकत नाहीत.आज धनगर आपण आदिवासी आहोत असा दावा करत आहेत ते केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटीच !
त्यांना वाटते आदिवासी असंघटीत व साधेभोळे आहेत. आपण त्यांच्यात घुसण्याच प्रयत्न
केले तर ते प्रतिकार करणार नाहीत. परंतु आज आदिवासींचे आंदोलन बघून त्यांचे धाबे दणाणले. खरे म्हणजे धनगर समाजाचा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही. शुधीर जोशी कमिटीने धनगर समजाला आदिवासिमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते शक्य झाले नाही.त्या कमिटीत धनगर समाजाचे नेते प्रत्यक्ष अण्णा डांगे होते. त्यानाही ते शक्य झाले नाही .
तसेच १९८१ साली केंद्रा सरकारने सुद्ध धनगर जातीचा आदिवासीमध्ये सामील होण्याचा प्रास्तव पूर्णपणे नाकारला. त्यामुळे माझा धनगर समाजाच्या नेत्यांना प्रेमचा सल्ला आहे कि त्यांनी आदिवासी मध्ये येण्यासाठीची केवीलवाणी धडपड करण्यापेक्ष.स्वतंत्र सूचीची मागणी करून वाटेल तेवढे आरक्षण घ्यावे.
Read more ...

घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख

महाराष्ट्र शासन | आदिवासी विकास विभाग -
महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र 
शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४ 
जी.आर. दिनांक - 24-04-१९८५ 
यामध्ये सर्व घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे pdf फाईल मध्ये पान क्र ११ वर बघा . आणि जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत पोहचवा 
अधिक माहिती साठीhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Ratnagiri/GCST048501.PDF


Read more ...

सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद

पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीच्या भिंती अस्पष्ट होत असताना फक्त सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद विनाकारण सूरु करून आदिवासी समाजाला वेठीस धरण्याचा जो किळसवाणा प्रकार मला दिसला तो बघून मला बालपणी आजी भीती दाखवायची त्या भोकाडिची आठवण झाली.

मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे.

आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.

राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.

आदिवासी आता जागा झाला आहे....नक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात घ्यावा लागेल.

प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्म....यातून देशाच्या विकासात आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून पुढे येईल.

सामाजिक स्वास्थ्य हे सर्वांच्या एकीवर अवलंबून असते. परंतु आजची ही राजकीय हरामी मंडळी या एकीवर कु-हाड चालवत आहेत. ज्यांनी सावरायला हवे तेच बोटं समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.

वास्तविक आरक्षण हा विषय या राजकारणी व्यक्तींचा नाहीच मुळी....तो लोकसभेच्या अखत्यारित आहे. हे माहीत असतानाही फक्त आणि फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी जणु काही हे नेते प्रयत्नशील आहेत.

परकीय शक्तिन्नी आपल्या देशात येवून एखादा खुप मोठा विनाशकारी प्रयत्न करावा या प्रकारचे कार्य काही नेते करत आहेत.

जंगलचा राजा म्हणजे आदिवासी.....आज जागा झालाय हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पण त्याने कुणाची शिकार करू नये असे वाटत असेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.

विद्रोही
आदिवासी संघर्ष


Read more ...
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti