Breaking News
Showing posts with label Comments. Show all posts
Showing posts with label Comments. Show all posts

धनगर ×आदिवासी = एक नियोजित सामाजिक संघर्ष

धनगर ×आदिवासी
एक नियोजित सामाजिक संघर्ष
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत ( आदिवासी ) मध्ये समावेश करावा या प्रश्नावर सध्या महाराष्ट्र राज्याचे वातावरण तापले आहे . धनगर आरक्षण या महत्वाच्या मुद्द्यावर राज्यातील “भाजपा” सरकार गरोदर झाले आहे धनगर समाजाची एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी धनगर समाजाला आरक्षण नावाचे मस्त आणि मोठे गाजर बीजेपी सरकारने दाखवले त्यात त्यांना यश आले . आता मात्र धनगर आरक्षण हा सामाजिक प्रश्न राहिला नसून तो राजकीय झालाय हे स्पष्ट होतंय .खरे तर धनगर समाजाचा आदिवासी समाजात समावेश करण्याची मागणी या पूर्वीही अनेक वेळा झालीय या मागणीची पूर्तता करण्याचा प्रयत्न १९६६ आणि १९७८ मध्ये झालाय मात्र धनगर समाज आदिवासी असल्याचे सामाजिक सांस्कृतिक पूर्ण होत नसल्याने केंद्रीय संस्थांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते एखादा समाज आदिवासी आहे आणि कसा हे ठरवण्यासाठीचे निकष निर्धारित आहेत आदिवासी असण्याची कोणतीच लक्षणे धनगर समाजात दिसत नाहीत त्यामुळेच १९८१मध्ये धनगर आरक्षण प्रस्ताव केंद्र सरका ने राज्याला परत पाठवला आहे .शिवाय राज्य सरकारनेही हा प्रस्ताव ६ नोव्हेंबर ला मागे घेतल्याचे दिसत आहे . मग आता हा सामाजिक मुद्दा राजकीय पातळीवर एव्हडा पेटल्याचे कारण का तर फक्त सामाजिक संघर्ष तयार करूने असे म्हणता येईल . वास्तविक धनगर आरक्षण हे राष्ट्रवादी ने तयार केलेले पिल्लू आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . धनगर आरक्षण नावाच्या ठिणगी ला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व अजित पवार यांनी बारामतीत हवा दिली . आणि आमच्या आदिवासी नेत्यांनी पवार बंधू किव्हा राष्ट्रवादीच्या विरोधात बंड ण पुकारता धनगर समाजाच्या विरोधात आंदोलने पेटवली . आजही हि परिस्थिती कायम आहे . राष्ट्रवादीचे नेते “ धनंजय मुंडे “ सातत्याने धनगर आरक्षणाची मागणी करत आहे तर आदिवासी नेते धनगर विरोधी भूमिका मांडत आहेत . शिवाय पुढे धनगर आरक्षण हा राजकीय मुद्दा करून गाभण राहिलेले बीजेपी सरकार देखील आता धनगर आरक्षणावर वेळोवेळी बोंबा मारत आहेत . वास्तविक अनुसूचित जमातीत नव्याने एखाद्या जातीचा किव्हा जमातीचा समावेश करणे किव्हा वगळणे करायचे असल्यास मोठी घटनात्मक प्रक्रिया असते . त्यात राज्य सरकार ,आदिवासी सल्लागार समिती रजिस्टार जनरल ऑफ इंडिया ,राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग ,राज्य आणि केंद्र सरकार मधील सबंधित मंत्रालयातील अंतर्गत सहमती व समन्वय , संसदीय स्थायी समिती ,संसद व सर्वात शेवटी राष्ट्रपती हे सर्व आडथळे आहेत . यातील कुणी एकाने जरी कुठे आडकाठी घातली किव्हा कुणा एका सदस्याचे समाधान होत नसेल तर समाजशास्त्र व मानववंश अभ्यासाची मागणी होते किव्हा यात बरेच प्रस्ताव कायमचे रद्द होतात .आता हे सर्व प्रकार धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या लोकांना , नेत्यांना ,किव्हा अभ्यासकांना माहित नसतील हे कधीच शक्य नाही पण मग ५ वर्ष काहीतरी राजकीय मुद्दा हवाय म्हणून हा सारा खटाटोप असतो . सत्ताधारी स्वताला अतिशहाणे समजत आहेत तर सत्ता आणि खुर्ची गेलेल्या नेत्यांची अवस्था “ लूस “ झालेल्या कुत्र्यासारखी झाली आहे . लूस झालेल्या कुत्र्यावर मालक किव्हा रस्त्याने ये जा करणारा वाटसरू कधीच लक्ष देत नाही पण आपल्याकडे कुणीतरी लक्ष द्यावे व आपल्यातही अजून धमक आहे या भावनेने हे कुत्रे अधून मधून अंगावर बसणार्या माश्यांवर देखील भुंकत असते . बस एकदम अशीच स्थिती तयार केली जातीय . धनगर आरक्षण या मुद्द्यावर भाजपाला ठाम राहावे लागेल कारण त्यांच्या विजयात धनगर समाजाचा खूप मोठा वाटा आहे , फडणवीस सरकार येवून ९ महिने झालेत तरी अध्याप धनगर आरक्षणावर ठोस निर्णय नाही “ लग्न झाल्यानतर जर नवीन सुनेकडून चार पाच महिन्यात काही आंबट चिंबट खायची मागणी होत नसेल तर संपूर्ण घरातील लोकांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो कालांतराने तिला “ वांझोटी “ पण म्हटले जाते मग सर्वांना खुश ठेवण्यासाठी तिला “,मळमळ उलटी,आंबट गोड , हात दुखले पाय भरले “ सारखे कृत्रिम प्रकार करायला लागतात तसेच भाजपा आणि फडणवीस सरकारच्या बाबतीत आणि धनगर मतांवर निवडून आलेल्या धनंजय मुंडे सारख्या नेत्याला करावे लागत आहे . धनगर आरक्षण हि गोष्ट एका रात्रीत किव्हा एका वर्षात अथवा पाच वर्षात पूर्ण होण्यासारखी अजीबात नाही मात्र धनगर विरुद्ध आदिवासी वातावरण तापलेले कसे राहील याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे धनगर नेत्यांना मोर्चे आंदोलने काढावे म्हणून रसद पुरवली जातीय तर आदिवासी नेत्यांनी या आरक्षणाला विरोध करावा म्हणून त्यांच्या पाठीवर हात फिरवला जातोय ( तसे नसते तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि मधुकर पिचड एकाच पक्षात राहून एकमेकांच्या विरोधात निर्णय घेतेच नाही किव्हा हि मागणी मान्य होत नसेल तर समाजासाठी दोघांनीही पक्ष सोडला असता ) राहिला फडणवीस सरकार तर लवकरच त्यांचे १ वर्ष पूर्ण होतेय . अगदी लहान लहान गोष्टीवर दररोज वृत्तवाहिन्यावरील वाद संवादातून पोपटासारख्या गप्पा झोडणाऱ्या देवेंद्र फडणवीस “जी जणतिय , तीच कन्हतीय “ याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय धनगर आरक्षणापेक्षा महाराष्ट्र राज्यात अनेक महत्वाचे मुद्दे आ वासून उभे आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊन धनगर आदिवासी हा झेंडा दाखवला जातोय त्यात बऱ्याच आदिवासी नेत्यांनी पंचवार्षिक सुट्टी घेतलीय आपल्या लोकांनी आपल्याला विसरून जावू नये म्हणून मोर्चे , आंदोलने, मेळावे , असे कमी खर्चातील आणि गेक्या गेल्या हार तुरे मिळून भाषणबाजी करायला मिळेल असे कार्यक्रमांचे प्रायोगिक आणि प्रायोजित कार्यक्रमाची आखणी करून “ आम्हीच ते लूस झालेले कुत्रे “ असी प्रसिद्दी करत आहेत . या बिनकामाच्या लोकांसाठी मात्र कष्टकरी आदिवासी समाज भरडला जातोय . धनगर आरक्षणाला आदिवासी कायमच विरोध करणार धनगर आरक्षण ( होणार नाहीच ) दिले तर स्वतंत्र भारतातील आदिवासी विरुद्ध सरकार हा सर्वात मोठा संघर्ष असेल शिवाय गडचिरोली चंद्रपूर सारख्या भागात असणारा नक्षलवाद समाजिक हितासाठी मुंबई ,ठाणे ,नाशिक, नगर ,अकोले भागात पाहायला मिळेल याची कल्पना सर्व राजकीय नेत्यांना आणि सरकारला आहे . मात्र पाच वर्ष सरकार फक्त धनगर आरक्षण या विषयावर पेटत ठेवायचे आहे , सत्ताधारी मारल्यासारखे करत आहेत तर विरोधक रडल्यासारखे करत आहेत . मस्त सांगड झालीय यांची . चू....कीच्या मार्गाने वेडयात काढायला आणि पाच वर्ष पूर्ण करायला धनगर आदिवासी हाच पर्याय सोपा वाटतोय ...पण आता दोन्ही समाजातील अभ्यासकांनी व राजकीय लोकांनी आपण जे करतोय ते सामाजिक हिताचे किती कि फक्त स्वार्थासाठी समाजाचा वापर करायचा हा विचार जरूर करावा .
विजयकुमार घोटे
मो.न. ९६२३७०१७०९
( हे माझे वयक्तिक आणि अनुभवातले विचार आहेत या विचारांशी कुणी सहमत असावे असे नाही )
Read more ...

अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये थेट समावेश करण्याचा अधिकार कोणत्याही सरकार वा न्यायालयास नाही

Apr 06, 2015 : News shared :

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या तात्काळ निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असतानाच, महाधिवक्ता आणि विधी व न्याय विभागाच्या सल्ल्याने हा निर्णय केंद्र सरकारवर सोपवून भाजपने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी स्वपक्षीयांनाच आव्हान दिले आहे. तसा प्रस्ताव पाठविण्याचा मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाला अधिकारच नाही, अशी ठाम भूमिका सवरा यांनी घेतली आहे.
एखाद्या जातीचा अनुसूचित जमाती (एसटी)मध्ये थेट समावेश करण्याचा अधिकार कोणत्याही सरकार वा न्यायालयास नाही, मात्र एखाद्या जातीबाबत भक्कम पुरावा असल्यास त्या समाज वा जातीचा एसटीमध्ये समावेश करण्याबाबत सविस्तर प्रक्रिया पूर्ण करून भारतीय राज्यघटनेतील कलम ३४२ नुसार राष्ट्रपतींना शिफारस करता येते. त्यानुसार राज्यात ‘धनगड’ आणि ‘धनगर’ एकच असून अनुसूचित जमातीच्या यादीत झालेल्या ‘प्रिंटिंग मिस्टेक’मुळे धनगर समाजास आरक्षण मिळालेले नसल्याचा दावा या समाजाच्या नेत्यांकडून केला जात आहे. राजकीय दबावानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याबाबत सकारात्मक असून त्यांच्याच इच्छेनुसार सरकारने विधी व न्याय विभाग आणि राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांचा धनगर समाजास आरक्षण देण्याबाबतच्या वादावर अभिप्राय मागविला होता. त्यानुसार पालघाट (जिल्हा थंडन) समुध्याय संरक्षण समिती विरुद्ध स्टेट ऑफ केरळ या खटल्याच्या निकालाच्या आधारे अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात धनगरांचा समावेश करण्याबाबत राज्यघटनेच्या कमल ३४२(२) नुसार कार्यवाही करण्याची केंद्रास विनंती करणारा प्रस्ताव आदिवासी विभागाने तयार करावा आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने तो पुढील कार्यवाहीसाठी केंद्राला पाठवावा, असा अभिप्राय महाधिवक्ता सुनील मनोहर तसेच विधी व न्याय विभागाने सरकारला दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

आदिवासी विकासमंत्री विरोधात
कोणत्याही जाती अथवा समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची एक प्रक्रिया असून त्याच्याबाहेर जाऊन कोणालाही निर्णय घेता येत नाही, असे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. एखाद्या समाजाने एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी केल्यानंतर त्यावर आदिवासी विकास संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अभिप्राय मागविला जातो. नंतर आदिवासी विकासमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समिती त्यावर निर्णय घेते. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविला जातो. त्यांच्या अभिप्रायानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनजाती सल्लागार समितीसमोर पाठविला जातो. या समितीने मान्यता दिल्यानंतर तो प्रस्ताव शिफारशींच्या स्वरूपात केंद्रास पाठविला जातो. केंद्रातही खूप मोठी प्रक्रिया असून संसदेच्या मान्यतेनंतरच हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठविला जातो, मात्र कोणाच्या तरी अभिप्रायाने परस्पर असा प्रस्ताव थेट केंद्रास पाठविता येणार नाही. शिवाय धनगर समाजात भटक्या विमुक्तांचा समावेश असून एसटी प्रवर्गाचे फायदेच त्यांना मिळत असल्याने धनगरांचा एसटीत समावेश कशाला, असा सवालही सावरा यांनी केला.1
Read more ...

ना. विष्णु सवराना पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्यभरात आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन

आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा अध्यक्षतेखाली नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक जिल्हा आदिवासी संघटना प्रतिनिधीची बैठक झाली... या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून राज्यभरात निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा आणि त्यांची सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब, नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव पांडू गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी आमदार पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात सर्व आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्याचे ठरविले आहे. दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे जिल्हाधिकार कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी महादेव कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष शहर पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल हजर होते. नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन करणार आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी www.jago.adiyuva.in
Read more ...

तुम्हाला काय वाटते नक्की कळवा.

आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहेआपल्यांना आवडेल त्या राजकीय चळवळीशी जोडून तन मन धनाने आदिवासी समाजाच्या हिता साठी लढणे जरी योग्य असले तरीसध्याची परिस्थिती लक्षात घेता जर सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय फायद्या साठी आदिवासी अस्तित्व नष्टकरण्याच्या मार्गावर असतील तरआदिवासींनी इत्तारांचे झेंडे मिरवण्यात रक्त आटवन्या पेक्षा आदिवासी हिता साठी आदिवासींचा स्वतंत्र पक्ष का असू नये ?
८५ मतदार संघात आदिवासींची निर्णायक मते आहेत२५ विधानसभा आणि  लोकसभा मतदार संघ आपल्या साठी राखीव आहेत याचा नाक्कीच विचार करावासुरवातीला नक्कीच कठीण वाटेल पण जर सगळे आदिवासी एकत्र आलो तर नक्कीच आपल्या निम्म्या पेक्ष जास्त समस्या क्षणात सुटतील 
आता वेळ आहे आदिवासींनी आपले अभ्यासूस्वाभिमानीप्रामाणिकआक्रमकतडफदारसामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व घडवण्याचे … तुम्हाला काय वाटते नक्की कळवा.
Read more ...

आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा


आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ………


अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय …. 


याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली आहे …. परभणी मधील राष्ट्रवादी भवन आदिवासी वस्तीग्राहतील विद्यार्थ्यांनीफोडले या कारणामुळे कुठलीही शहानिशा न करता वस्तीग्र्हातील दिसेल त्या विद्यार्थ्यावर मारहाण करून गुन्हे दाखल केले …. 

या बाबत आदिवासी प्रेकल्प अधिकारीकिवा वस्तीग्र्हा ग्रहपाल यांना पूर्व कल्पना किवा परवानगी घेणे गरजेचे आहे,अत्यंत गंभीर गुनेह्गार आहेत अशी वागणूक या मुलांना मिळाली… 

माझा प्रेश्न आहे या यंत्रणेला तुम्ही गंभीर गुनेह्गाराला किवा राजकीय आंदोलकांना सुद्धा या प्रेकारची वागणूक देत नाही ती या पोलिसांनी शिकणाऱ्या आदिवासी मुलांना दिली … 
दुसरी घटना या पेक्षा गंभीर असून आदिवासी संघटनांना विचार करण्यास व न्याय कुठे माघावा हाप्रेश्न तुमच्या समोर येणार आहे …. 

भोकर जि . नांदेड येथील पाढूरणा संस्थेची आदिवासी आश्रम शाळा असून येथिल संस्थेचा मुजोर संस्थाचालक वारंवार मुलांना त्रास देत होता या बाबत सर्वन समक्ष व पोलिस समोर एका मुलीला धक्का सुधा दिला …
या बाबत पालक,समाजसेवक ,विद्याथी जाब विचारण्यास गेले असता लाठीमार झाला त्यातून दगडफेक झाली व काही पोलिसांना गंभीर दुखापत झाली …. 
पण नंतर जी दडपशाही झाली त्यामध्ये समंदर वाडी व काही गावात जाऊन महिला व निष्पाप लोकांना अमानुष मार खावा लागला अजूनही कित्यक आदिवासी बांधव त्यांच्या गावामध्ये किवा शाळेतील मुले त्यांच्या शाळेमध्ये किवा घरी सुधा गेली नाही …. 
माझ्या मित्रानो या गावकर्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे ते गावकरी पोलिसांच्या भीतीने जंगलात जाऊन लपले आहेत व प्रेचंड घाबरले आहेत ……
या घटनेचा निषेध आपण करावा व सर्वच जिल्ह्यांमधून आदिवासी संघटनांनी या विद्यार्थी तसेच गावकरी यांच्या मानसिक छ ळा बद्दल निवेदने पाठवावेत व मानवहक्क आयोगाकडे दाद माघावी व या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या अधिकार्यावर अनुसचीत जाती -जमाती कायद्यानुसार कार्यवाही व्हावी हि मागणी आपण शासनाकडे करावी हि माझी आपल्याला विनंती…।

यशवंत पावरा.शिरपूर
(आदिवासी कार्यकता )

Read more ...

आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे

आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे. आपल्यांना आवडेल त्या राजकीय चळवळीशी जोडून तन मन धनाने आदिवासी समाजाच्या हिता साठी लढणे जरी योग्य असले तरी, सध्याची परिस्थिती लक्षात घेता जर सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय फायद्या साठी आदिवासी अस्तित्व नष्ट करण्याच्या मार्गावर असतील तर, आदिवासींनी इत्तारांचे झेंडे मिरवण्यात रक्त आटवन्या पेक्षा आदिवासी हिता साठी आदिवासींचा स्वतंत्र पक्ष का असू नये ?
८५ मतदार संघात आदिवासींची निर्णायक मते आहेत. २५ विधान सभा आणि लोकसभा मतदार संघ आपल्या साठी राखीव आहेत याचा नाक्कीच विचार करावा. सुरवातीला नक्कीच कठीण वाटेल पण जर सगळे आदिवासी एकत्र आलो तर नक्कीच आपल्या निम्म्या पेक्ष जास्त समस्या क्षणात सुटतील 


आता वेळ आहे आदिवासींनी आपले अभ्यासू, स्वाभिमानी, प्रामाणिक, आक्रमक, तडफदार, सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व घडवण्याचेतुम्हाला काय वाटते नक्की कळवा.
Read more ...

जीवनातील प्रत्येक क्षण आदिवासी समाज संघटीत करण्यासाठी - विजय पवार

आमच्ये मित्र आदिवासी चळवळी चे उभारत्ये युवा नेतृत्व माननीय श्री.विजय पवार यानी आदिवासी समाजाला उद्देशून चांगला लेख लिहिला आहे .आदिवासी तरुणानी-तरुणिनी हा लेख विशेष करून वाचावा त्याचे चिंतन-मनन करावे विजय पवार यानी मंडलेल्या विचारस आम्ही पूर्ण पणे सहमत अहोत.
मागे पुण्यातील काही आदिवासी समाजातील तरून आपल्या पक्ष प्रेमाणे इतके अंधळे झाले होते की त्याना त्यांचा पक्षा बद्द्ल त्यांचा पक्षाची आदिवासी समाजाला बाधा येईल असे धोरण लक्षात अणून दिले त्यावेळी त्यानी ती आमची भूमिका मान्य केली नाही आणी आमचाशी वाद घातले.
मी माझ्या वैयक्तिक अनुभवा वरून संगतो प्रत्यक पक्ष आपणास फक्त वापरून घेतो. आपला पक्ष तो असावा जो आदिवासी हिताला प्राधन्य देईल. नजिकचा कळात आदिवासी समाजाला आपल हित साधून घ्यायच असेल तर आदिवासी समाज संघटित करावा लागेल.जर आदिवासी संघटीत असता तर डिंभ्ये धरण झाले त्याचवेळी विस्तपित झालेला माझा आदिवासी बंधवाच योग्य पुनर्वसन झाल असत. पुनर्वसन योग्य प्रकारे न झाल्यामुळे निरअपराध माळीन गावातील माझे आदिवासी बांधवाना आपला जीव गमवावा लागला नसता......!! त्यांच खरोखर शासनाने योग्य पुनर्वसन केल असत तर त्याना डोंगर कापारीत रहाण्याची गरज भासली नसती. आपन नालायक अहोत कारण अपण संघटीत नाही.या लेखामधून आम्ही सर्व आदिवासी बंधवाचा वातीने माळीन गावातील मृत झालेल्या आदिवासी बंधवान भावपूर्ण श्रधंजली अर्पण करतो....!! हीच घटना दलीत किवा इतर उच्च समाजात घडली असती तर लोक रस्त्यावर आले असते. आपल्याला लाज वाटायला हावी आजूनही आपण शांत अहोत चला एक संकल्प करू माळीन गावातील आदिवासी बंधवान श्रधाजली अर्पण करू की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आदिवासी समाज संघटीत करण्यासाठी, आदिवासी समाज विकासा साठी खर्च करू........!!
सांभर आमचे मित्र विजय पवार यांचा अग्रलेख देत अहोत...
""आदिवासिंनो काळ आलाय.....लढते व्हा पेड़ न्यूज आणि समाजाच्या एकजुट दबावामुळे आदिवासी समाजाचे हक्क धनगर डोळ्यादेखत हिसकावून नेत असताना मी आदिवासी अजुनही शांत कसा? राष्ट्रवादी,कॉंग्रेस,भाजप, शिवसेना आणि मनसे या पक्ष्याचे झेंडे अभिमानाने मिरवणा-या आदिवासी माय-बापहो तुमची आदिवासी माय तरी तुम्हाला माफ करील का? काय नाही दिले आपणास आदिवासी या एका संकल्पनेने.....मग अजुनही आपण मुग गिळुन गप्प का? आपली शैक्षणिक गुणवत्ता आपल्या पोटात घेवुन आपणास मोठ मोठ्या पदांवर नेमणूक केली. फक्त आदिवासी शब्द बाजुला काढून बघा....आपली खरी लायकी आहे ती कळेल ? मग असे असताना आपल्या आदिवासी बांधवांच्या रक्षणात आपण मागे का? एक-दोन मंत्री फक्त आपल्या पदाला लाथ मारण्याची भूमिका घेत असताना बाकीचे कुठे आहेत यांची मानगुट आपण पकडणार का? धनगर आपल्या राजकीय आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर आपल्या घरात घुसण्याचा निकराचा डाव साधत आहेत. याला पेड़ न्यूजवाले चांगली साथ देत आहेत. काय आपण मेडीयाला घटनेतील खरे वास्तव दाखवणार का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असे म्हणत असताना काय आपलेच आदिवासी खासदार आणि आमदार आपल्या आवाजात विरोध दर्शविणार का? आज कोल्हापुरचे आन्दोलन बघा.....फक्त महाराष्ट्र नावासाठी त्यांनी किती बस फोडल्या. मग काय आपल्यात ती धमक नाही. अरे त्यांचा प्रश्न आपल्या मानाने काहीच नाही. इथे तर काळजाला भीड़लेल्या भुकेचा राजकारणात बाजार मांडला जात असताना आदिवासी अजुनही गप्प का? अरे आदिवासी भागात देशाच्या विकासाचे अनेक स्त्रोत आहेत. त्यात आपले आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे. चला उद्या जर सरकार आपल्या विरोधात घटनेला डावलून निर्णय घेत असतील तर......कामाला लागा !!! राज्यातील नव्हे अवघ्या देशातील नैसर्गिक स्त्रोत संपुष्टात आणण्यास सज्ज व्हा....!!! जरी ते बळी तो कान पिळी अशी भूमिका घेत असतील तरी आपणास हे ठावुक हवे की नाक दाबले तर तोंड उघडते......मग आपल्या भागात विद्रोही कारवाया करून प्रत्येक सरकारी खात्यात आदिवासी बाणा दाखवून द्या. वेळ आल्यास धरणे-डोंगर, खाणी या क्षेत्रातील आदिवासी महत्त्व पटवून द्या....आणि नसतील पटवून घेत तर रांडच्यांना त्याचे जळते दृश्य दाखवा. सरकारच्या सर्व योजनांवर बहिष्कार टाका. सरकारच्या सर्व पदाधिका-यांना आपल्या क्षेत्रात प्रवेश बंद करा. ऐकत नसतील तर बाम्बुचे फटके द्या. लोकांनी बस फोडल्या.....आपले काय हात बांगडयान्नी सजवले आहेत? आपला तीर कामटा फक्त घोषणेत मर्यादित न ठेवता त्याचा वापर जगाला दाखवून द्या. स्वाभिमान पणाला लावू नका....त्याला जागवा आणि त्याचा वापर करा. मला माहीत आहे आपण खुप काही करू शकता. फक्त गरज एका ठिणगिची । काय उद्याचा सूर्य आदिवासी क्रांतीचा असेल?
आपकी जय - जय आदिवासी..!!
सप्रेम " हर हर महादेव " कैलास शार्दूल - संस्थापक - ( आदिवासी महादेव कोळी समाज विकास संघटना )

 photo Swayatt Jilha petition
Read more ...

पुसदवालो तुम्हारा भी बडा नाम है


पुसदवालो तुम्हारा भी बडा नाम है
पुसदच्या कार्यकर्तांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी शरद पवारांचे ठीक ठिकाणी २२ पुतळे जाळले.पुसद येथील पांडुरंग व्यवहारे , सुरेश धनवे , राजेश धगे, अड. राम भडांगे इत्यादी बिन्निचे कार्यकर्त्ये आहेत. ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात.ते एखाद्या योद्ध्यासारखे कामाची आखणी करतात. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. तसेच इगतपुरीच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. या निमित्ताने शरद पवारांना आणि धनगर नेत्यांना मी सांगू इच्छितो कि त्यांनी आदिवासी समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. तुम्हाला आरक्षण हवे असेल तर जरूर ते तुम्ही घ्या.परंतु आमच्या वाट्यातले नाही. आदिवासी काहीच करत नाही असे समजून आमच्या अंगावरचे कपडे काढून घेऊ नका. असे कराल तर नंगा नाच करण्याबगर आम्हाला दुसरा पर्यायच राहणार नाही., ह्याची नोंद घ्यावी. कळावे लोभ असावा - 
Madhav Sarkunde
Read more ...

आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

जय आदिवासी
जय बिरसा मित्रंनो दि . 17-08-2014 रोजी परभणी येथे झालेल्या दगडफेकीमुळे वसतीगृहातील आदिवासी विद्यार्थांना पोलीसांच्या दडपशाहीखाली अटक करण्यात आली. याची नोंद कळताच जिंतुर मधील आदिवासी कार्यकर्तेनी परभणी गाठली.
आज कॅमुनिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.राजन क्ष्रीसागर , डाॅ .संतोष टारफे, डाॅ.सतीष पाचपुते आदिवासी संघटक व कार्यकर्ते उपस्थीत होते, यांनी आदिवासीं विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी व पोलीसखोरांच्य बंडाविरूध्द नवी दिल्ली येथे नोटीस पाठविण्यात आली.

D.D. Shelke


Read more ...

उमराखेडचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार !


उमराखेडचा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणार !
उमरखेड येथे २०/८/१४ ला भव्य आदिवासी मोर्चा निघणार आहे. आणि या मोर्च्याचे एक खास वैशिष्ट्ये राहणार आहे. या मोर्च्याची बातमी ऐकून शरद पवार थंडगार होणार नाही तर नवलच ! १५ हजार लोकं एक खास ऐटम या मोर्च्यात करणार आहेत. म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व मिडिया २० तारखेला उमरखेड येथे जमा होणार आहेत. या तारखेला जिथे जिथे मोर्चे असतील तिथल्या आयोजकांनी मला फोन करून या विषयी विचारावे आणि तसाच ऐटम तिथे करावे. ह्यामुळे आपल्या आंदोलनाला वेगळे वळण लागणार आहे.आणि मतांचे राजकारण करणा-या नेत्याच्या बुडाला मिराच्या लागणार आहेत.तसेच मी जे काही सांगितले ते मोर्चा होईपर्यंत गोपनीय ठेवयाचे ह्याची नोंद .माझा फोन न ९४०५७०८७३७, - 
Madhav Sarkunde

Read more ...

बाहेर पडा आणि इतिहास घडवा

अनेकदा आपण तक्रार करतो की आमचा इतिहास लिहिला नाही....पुढे आणला नाही.

लोकांच्या नावाने बोटे मोड़त घरात बसण्यापेक्षा 

बाहेर पडा आणि इतिहास घडवा

घुसखोरांची बोटे छाटण्याची वेळ आलीय.

विद्रोही
आदिवासी संघर्ष

Read more ...

हळुहळु पुसण्याचा प्रयत्न चालविला आहे।

घुसखोरांचे आंदोलन राज्यभर पेटले
आपण राज्य पेटविण्यास सज्ज व्हा।

धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न घटनादुरुस्ती करून सोडवू असे म्हननारे बघितले का?

अरे या लांडग्यान्नी बाबासाहेबांच्या लिखाणाला हळुहळु पुसण्याचा प्रयत्न चालविला आहे।

विद्रोही
आदिवासी संघर्ष

Read more ...

शेतकरी बांधवाच्या पदरात काय पडले?

आज पर्यन्त आरक्षण नावाच्या कुबड्यांचा फ़ायदा नोकरदार वर्गानेच घेतला आणि येथून पुढेही तेच घेतील.

एका घरातील चार चार जणांना नोकरी मिळाली या आरक्षण धोरणामुळे।

शेतकरी बांधवाच्या पदरात काय पडले?

अरे रोजच्याच समस्यांचा पाढा आहे.

ज्या भावाला स्वता राबुन शिकवले....नोकरीला लावले तो पण गावाला येत नाही. तो आणि त्याचा संसार मजेत आहे याचे समाधान फक्त मला लाभले.

अरे पण आज ज्याचा फ़ायदा तुम्ही घेतला त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलोय. पण तुम्ही तेच सुट्टी नायचे कारण सांगत आहेत.

अरे आरक्षण तसेही तुम्हीच भोगताय मग आम्ही तुम्हालाच लढू द्यायला पाहिजे होते. पण इथेही आम्ही पुढे आहोत.

कारण आम्हाला आमची संस्कृती जपायची आहे.

तुमचे काय....भागले आता...!

संस्कृती....समाज....गेला चुलीत...!

व्व़ा रे दुनिया।

एकलव्य असो की असो रावण सर्वांना आपण कपट करुनच मारले.

सुग्रीव व बाली हे खरे तर आदिवासी राजे पण त्यांनाही आपण कपट़ाने संपवले.

आजही धनगर आमच्या घरात घुसवुन आपण आम्हाला संपवू पाहत आहेत.

हे आपण सहज करू शकता कारण आमचेच नालायक ठरले आहे पैशाच्या मोहात....।

विद्रोही
आदिवासी रक्तरंजित क्रान्ति


Read more ...

आता संघर्ष अटळ आहे.

आतून बाहेरून
न्याय-अन्याय

जसा जमेल तसा आता संघर्ष प्रत्येकात लपलाय...!

फक्त वेळीच तो जागृत होणे आवश्यक...!

जमेल त्या मार्गाने आपणास आपल्या घरात येवू पाहत असलेली घाण साफ करायची आहे. फक्त असे करताना अंगावर धुळ बसता कामा नये असे सांगुन जमणार नाय.

आता संघर्ष अटळ आहे.

हा जिहाद आदिवासी कल्याणाच्या कामी येवो हीच अपेक्षा।

विद्रोही


Read more ...

आम्हाला ही राष्ट्रीय संपत्ति नष्ट करण्याची वेळ येवू देवू नका।

राज्यातील धरणे

राज्यातील जंगले

राज्यातील खनिजे

राज्यातील किल्ले

राज्यातील महामार्ग

राज्यातील लोहमार्ग

सर्व आमच्याच घरात आहेत.

आम्हाला ही राष्ट्रीय संपत्ति नष्ट करण्याची वेळ येवू देवू नका।

अन्यथा हम तो जायेंगे अपनी मर्जिसे इस दुनियाको छोड़कर....!

लेकिन आप ना जी पायेंगे तुम्हारी मर्जी होकर भी।

आदिवासी उलगुलान...!

विद्रोही
आदिवासी संघर्ष


Read more ...

आदिवासी पेटला जर का वणव्यात कळप साफ होईल...

दुसऱ्याच्या शेतात घुसणं
मेंढरांनो चांगलं नाही
लांडग्या कोल्ह्यांच काहीही ऐकून
उगाच भांडत बसू नका
आमच्या जंगलात,आमच्या कुरणात
आमच्या कळपात घुसू नका
तुम्हाला शब्द देणारे
ते काही देव नाही
आमच्या कळपात घुसावायला
त्यांच्या बापाची ठेव नाही
आदिवासी म्हणजे काही
पायामधली वहाण नाही
डोंगराचा राजा तो
आदिवासी लहान नाही
इतिहास आहे साक्षीला आम्ही
कुणाच्या वाटेला गेलो नाही
शाई असो केमिकल असो
गाडीच्या काचा फोडल्या नाही
अन्यायाने होणारे घाव
आजपर्यंत सोसत राहिलो
बायका मुलं उघडी करून
संसार त्यांचे पोसत राहिलो
म्हणून असं समजू नका
आम्हाला अजून झोप येते
आभाळासारखी माया आणि
वाघासारखी झेपही येते
आदिवासी पेटला जर का
वणव्यात कळप साफ होईल
राख पण दिसणार नाही
मेंढरांची वाफ होईल......

Read more ...

हा आदिवासी इतिहास चोरला

आदिवासी टोळ्यान्ना चार-पाच हजार वर्षांपूर्वी 'गण' म्हणत असत आणि या गणान्च्या नायकाला 'गणपती' म्हणत असत.

हा आदिवासी इतिहास चोरला

आता जात चोरत आहेत.

एकलव्याचे वारस आम्ही तरी शांत ।

एक तीर एक कमान
साधा घुसखोरान्वर निशान।

विद्रोही
आदिवासी संघर्ष


Read more ...

आता मला नाही वाटत की मी स्वतंत्र आहे.

आता मला नाही वाटत की मी स्वतंत्र आहे.

मग काय 14 ऑगस्ट काय आणि 15 ऑगस्ट काय..!

सारखेच दिवस...!

ज्यांच्यासाठी माझे आदिवासी बांधव लढले ते स्वतंत्र झाले.

मी आदिवासी आजही स्वातंत्र्यासाठी झुंज देतोय.

विद्रोही
संघर्ष...उलगुलान....लढाई

Read more ...

लगता है पूरा planning बनाया सालो ने आदिवासीओं को मिटाने का....!

लगता है पूरा planning बनाया सालो ने आदिवासीओं को मिटाने का....!
दोष तो मै खुदको देता हूँ क्योंकि सब कुछ जानकर भी मै खामोश हूँ आखिरी कतार में ।
क्या नहीं मिला इस संस्कृती से समाज में 
जिंदगी ही असली सबूत है दुनिया इस मायाजाल में।
बस करो दुनिया की गुलामी आदिवासी वीरो
इतिहास के पन्ने आज भी खाली है आपकी बुलंदी आवाज में ।
विद्रोही

Read more ...

आदिवासिंनी रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहा ।

आदिवासिंनी रक्तरंजित क्रांतीसाठी तयार रहा ।
तंट्या मामा
बिरसा मुंडा
राघोजी भांगरे
खाज्या नाईक
महाराणी दुर्गावती
यांचे बलिदान जागवा
इतिहासाच्या पुनरावृत्तिसाठी तयार रहावे...!
विद्रोही
आदिवासी संघर्ष

Read more ...
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti