Breaking News

Tribal Leaders at Delhi to meet President : आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका

नवी दिल्ली: खोटी जात सांगत असल्याचा आरोप माझ्यावर होतो. मात्र जो हा आरोप करतो,
त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करा, जर खोटं आढळल्यास मला मुंबईत फाशी द्या, असं थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी दिलं आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीविरोधात आज आदिवसी समाजातील 18 आमदार आणि 2
खासदारांनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड,
क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी , माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके आदींचाही समावेश होता.
राज्यघटनेत धनगर समाजाला आधीच आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे आदिवासींच्या कोट्यातून
आता पुन्हा आरक्षण देऊ नये, असं पिचड यांनी यावेळी सांगितलं. मी आदिवासी आहे, त्यामुळे या समाजाचं संरक्षण करणं माझ कर्तव्य आहे, असंही पिचड यांनी नमूद केलं. तर धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा यावेळी क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते
पद्माकर वळवी यांनी दिला. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजाच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप करत नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडव
त्यामुळे अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी बारामतीमध्ये ठाण
मांडलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आदिवासींनी आता आव्हान दिलं आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या. पण त्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नका असा पवित्रा आदिवासी संघटनांनी घेतला आहे.

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti