Breaking News

प्रिय अजित पवार साहेब

प्रिय अजित पवार साहेब,
आपणास आदिवासीचा जोहार......!!!

आपण आजच्या काळातिल शकुनी आहात हे सर्व आदिवासी जनता जानत आहेच. परन्तु आमचे आपल्यावर खुप प्रेम आहे यातून मी हे आपणास लिहित आहे.

धनगर समाजाला आदिवासी होण्यासाठी अजित पवार यांनी पाठिंबा देण्यापेक्षा स्वता आदिवासी व्हावे.

कारण पवार या नामसादृश्यामुळे ते सहज आदिवासी असल्याचे सिध्द करू शकतात. ....तसेच सत्ता त्यांचीच आहे कोणी विरोध पण नाही करणार ।

संगमनेरचे थोरात लगेच पाठिंबा देतील.....कारण सध्या त्यांना दुसरे काही काम नाही.

बाळा नांदगावकर येईल पाठिंबा द्यायला आयताच....कारण यांना तर आपणच पोसले आहे.

गजानन कीर्तिकर भगवा घेवुन धावतिल आपल्या समर्थनाला कारण यांना सामाजिक शांतता मानवत नाही.

आणि आपण पेड़ न्यूज द्यायला विसरु नका.....कारण ते घटना न वाचताही नाविन्यपूर्ण पध्दतीने आपण आदिवासी कसे हे जगाला ओरडून ओरडून पटवून देतील.

जामकर आहेच मुलाखती द्यायला खोटे नाटे पुरावे घेवुन.

आदिवासींना सवय आहे हो....अगदी एकलव्यापासून आम्ही अन्याय सहन करत आलोय....आजचे शुक्राचार्य या ऊपर आम्हाला तो न्याय काय देणार...?

तसेही आपल्या आश्रमशाळा आमच्या अनेक पिढ्या शैक्षणिकदृष्टया अपंगच घडवत आहेत.

आपल्या योजना कागदावर रंगवल्या जातात....त्या काही भात शेतात भर पावसात राबणा-या आदिवासी पर्यन्त पोहचत नाहित.

कधी कोळी, तर धनगर आहेच आमच्या अस्तित्वाचा अंत पाहायला. विरोधक आज खरच खुप माजलेत....ते काही आम्हाला निट राहु देत नाहीत....निट तारपा घेवुन नाचु गावू देत नाहित.

जर अजित पवार साहेब आपण आदिवासी झालात तर आमची ताकद वाढेल....कोणी आमच्या कड़े वाकड्या नजरेने पाहू लागला तर त्याच्या तोंडावर मुतायला तेवढीच मदत होईल.

आपला जातबंधू
विद्रोही
आदिवासी संघर्ष


Online Petition 

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti