Breaking News

आदिवासी पेटला जर का वणव्यात कळप साफ होईल...

दुसऱ्याच्या शेतात घुसणं
मेंढरांनो चांगलं नाही
लांडग्या कोल्ह्यांच काहीही ऐकून
उगाच भांडत बसू नका
आमच्या जंगलात,आमच्या कुरणात
आमच्या कळपात घुसू नका
तुम्हाला शब्द देणारे
ते काही देव नाही
आमच्या कळपात घुसावायला
त्यांच्या बापाची ठेव नाही
आदिवासी म्हणजे काही
पायामधली वहाण नाही
डोंगराचा राजा तो
आदिवासी लहान नाही
इतिहास आहे साक्षीला आम्ही
कुणाच्या वाटेला गेलो नाही
शाई असो केमिकल असो
गाडीच्या काचा फोडल्या नाही
अन्यायाने होणारे घाव
आजपर्यंत सोसत राहिलो
बायका मुलं उघडी करून
संसार त्यांचे पोसत राहिलो
म्हणून असं समजू नका
आम्हाला अजून झोप येते
आभाळासारखी माया आणि
वाघासारखी झेपही येते
आदिवासी पेटला जर का
वणव्यात कळप साफ होईल
राख पण दिसणार नाही
मेंढरांची वाफ होईल......

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti