धनगड, धनवार, आणि धनगर ह्या एकाच आणि एक सारख्या जाती आहेत. म्हणून धनगर समाजाचा समावेश महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातींच्या यादीत करावा; अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतु डॉ. के.एस.सिंग यांनी त्यांच्या 'अनुसूचित जमाती 'या पुस्तकात पान क्रमांक 498 वर असे नमूद केले आहे, की मध्यप्रदेशामध्ये ऑरोनला 'धानका' व 'धनगड' असे म्हणतात. 1981 च्या जनगणनेनूसार त्यांची लोकसंख्या 89899 एवढी होती. ओराॅन धनगडाचा मुळ व्यवसाय शेती करणे हा आहे आणि त्यांच्यापैकी काही स्त्रीया चटया तयार करून विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांची प्रमुख भाषा हिंदी आहे. तथापि जे लोक मध्यप्रदेशात राहतात ते सादरी व हिंदी भाषेचा अंतर्गत व्यवहारासाठी उपयोग करतात. देवनागरी लिपीचा सुद्धा ते उपयोग करतात. ते 'अंधरीपाट' सारख्या स्थानिक गांव देवतांची पूजाअर्चा करतात. पश्चिम बंगालमध्ये ओराॅन ही जलपैगुडी , मिदनापूर आणि 24 परगणयात विखुरलेली आहे. ते ओरिसा व बिहार राज्यातून पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाली आहेत. महाराष्ट्रामध्ये 1981 च्या जनगणनेनूसार या जमातींची लोकसंख्या 70984 इतकी आहे. त्यांचा मुळचा व्यवसाय शेती आहे. त्यापैकी काही लोक मजुरी करतात. ते द्विभाषीक असुन ओरिया भाषा बोलतात आणि ओरिया बोलीभाषे अंतर्गत व्यवहारासाठी वापर करतात. साथीच्या रोगांपासून संरक्षण व्हावे, त्याप्रमाणे शिकारीमधये यश मिळावे आणि जनावरांचे रक्षण व्हावे म्हणून हे लोक चंडी, गोसळ देवता आणि देवी माईची पूजाअर्चा करतात. पूर्वी ते सुतकताई च्या पारंपरिक व्यवसाय करीत असत. सध्या चटया करणे , दोरखंड तयार करणे यासारखे व्यवसाय करण्यात गुंतलेले आहे. महाराष्ट्रामध्ये ओराॅनला 'कुरूख' आणि 'धनगड' म्हणून ओळखतात सध्या ते चंद्रपूर व गडचिरोली येथे एकञित झालेले आहेत. त्यांची सदरी इंडोआयॆन ही मातृभाषा असल्याचा दावा ते करतात. ते हिंदीमध्ये पारंगत आहेत. चंद्रपूर जिल्हय़ात बलारशाह पेपरमीलमध्ये जंगल कामगार म्हणून काम करण्यासाठी या भागात ते स्थलांतरित झाले आहेत. परंतु त्यांचे धनगर जातीशी कुठलाही सामाजिक , सांस्कृतिक, वैवाहिक अगर रक्तसंबंध नाहीत. केवळ नामसादृष्टयाच्या पलिकडे त्यांच्यात कोणतेच साम्य दिसत नाही व तसेच मत पॉलिटिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे माजी संचालक के. सुरेशसिंग यांनी देखील मांडलेले आहेत.तसेच धनवार (अनुसूचित जनजाती) ही महाराष्ट्र राज्यातील एक छोटीशी जमात आहे. 1971 साली यवतमाळ जिल्ह्य़ात या जमातींचे फक्त 9 जण आढळले. 1981 साली मात्र त्यांची संख्या अचानक 69809 एवढी झालेली दिसते. 'धनवार'ही गौंड व कंवर जमातींची उपशाखा आहे. मध्यप्रदेशातील छोटा नागपूर या प्रदेशालगत असलेल्या बिलासपूर या भूतपूर्व संस्थानातील जमीनदारांचे जमीनजुमले जसे होते. प्रदेश म्हणजे धनवारंची मायभूमी होय. या जमातींला धनुहार असेही नाव आहे. नामसदृषय असलेली धनगर जात सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या धनगर जातीशी धनवारांचा काही संबंध नाही. हे दोन समाज अगदी वेगवेगळे आहेत. शेळ्या , मेंढय़ा राखणारे 'धनगर'(अनुसूचित जनजाती) व 'धनगर'(अन्य मागासवर्गीय) या दोहोंत कसलेही साम्य नाही. महाराष्ट्रात धनगर ही भटक्या जमातींच्या यादीतील क्र.32 वर समाविष्ट केलेली जात आहे. धनवार व धनगर ह्या वेगवेगळ्या जाती-जमाती आहेत. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक वैवाहिक संबंध नाहीत .त्यांच्यात केवळ नाम साधर्मीय आहे. एवढय़ा वरून धनगर हे धनवार होवू शकत नाहीत. उत्तर प्रदेश मध्ये धनगर समाज अनुसूचित जातीच्या(ए.सी.) यादीत क्र.27वर समाविष्ट आहे. तसेच ओरिसा मध्ये धनगर समाज अनुसूचित जातीच्या (ए.सी. ) यादीत क्र.25 वर आहे. बिहारमध्ये धनगर समाज (अनुसूचित जातीच्या यादित क्र.10 वर आहे. मग हे लोक आम्हाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा; अशी मागणी का करत नाहीत. केवळ अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करा असा आग्रह का?कारण अनुसूचित जात प्रगत आहे. ते आम्हाला घुसू देणार नाहीत.सवलती मिळू देणार नाहीत.आदिवासी अज्ञानी आहेत, मग त्यांच्या सवलती आम्हाला पटकवता येईल हा उद्देश दिसतो. म्हणून सर्व आदिवासींच्या वतीने नम्र विनंती आहे, की खऱ्या आदिवासींच्या बाजुने उभे राहावे. माहिती आदिवासी दिनदर्शिका- 2015.
No comments:
Post a Comment