Breaking News

'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे?

खाली धनगर या जातीच्या अथवा त्या जातीशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींच्या अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांच्या भारतातील विविध राज्यांतील समाविष्ट केले गेलेल्या क्रमांकासहीत याद्या दिल्या आहेत. त्यात असे लक्षात येईल की धनगरांचा Dhangar असा स्पष्ट उल्लेख असल्याची नोंद दोन राज्यांत असून तिथे त्यांस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे. 

इतरही एकूण सहा राज्यांत धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्याजातींस अनुसूचित जाती चे आरक्षण आहे. अशा प्रकारे एकूण ८ राज्यांत धनगर अथवा त्या नामाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस अनुसूचित जातीचेच आरक्षण मिळालेले आहे.

त्याउलट धनगर या नावाशी साधर्म्य असणाऱ्या धानगड
(Dhangad) या जमातीस तीन राज्यांत अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. त्यातही विशेष नमूद करण्याची गोष्ट अशी की या तीनही राज्यांत धानगड (Dhangad) या जमातीचा उल्लेख केवळ उराँव (Oraon) या अनुसूचित जमाती बरोबरच करण्यात आला आहे. मग आता प्रश्न असा आहे की जर आठ राज्यांत धनगर अथवा त्या नावाशी नामसाधर्म्य असणाऱ्या जातींस 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळालेले आहे, तर मग त्यांना महाराष्ट्रात धानगड नावाची एक दुसरी स्वतंत्र जमात अस्तित्वात असताना 'अनुसूचित जमातीचे (ST) आरक्षण का हवे आहे? ते 'अनुसूचित जाती'चे (SC) आरक्षण मिळविण्यासाठी का लढत नाहीत?

यादी खालीलप्रमाणे
Scheduled Tribes
State Sr. No Name
Chhattisgarh 33 Oraon, Dhanka, Dhangad
Madhya Pradesh 35 Oraon, Dhanka, Dhangad
Maharashtra 36 Oraon, Dhangad
Scheduled Castes
Bihar 10. Dom, Dhangad, Bansphor,
Dharikar, Dharkar, Domra
Haryana 15. Dhogri, Dhangri, Siggi
Himachal Pradesh 24. Dhogri, Dhangri, Siggi
Jharkhand 9. Dom, Dhangad
Punjab 15. Dhogri, Dhangri, Siggi
Uttar Pradesh 27. Dhangar
West Bengal 17. Dom, Dhangad
Uttaranchal 27. Dhangar

वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त अजून थोडी माहिती देतो.

पुढील राज्यांत/केंद्रशासित प्रदेशांत धनगरअथवा त्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या जातींस "ओबीसी" (OBC) आरक्षण आहे. ST आरक्षण नव्हे.

१) छत्तीसगड २) दमन आणि दीव ३) दिल्ली ४) गोवा
५) गुजराथ ६) झारखंड ७) कर्नाटक ८) मध्य प्रदेश
९) महाराष्ट्र

वरीलपैकी काही राज्यांनी धनगर जातीस OBC तून NT
चा विशेष दर्जा दिला आहे. ती राज्ये पुढील प्रमाणे.
१) छत्तीसगड २) गुजराथ ३) मध्य प्रदेश ४) महाराष्ट्र
याव्यतिरिक्त ८ राज्यांनी धनगर या जातीस SC
चा दर्जा दिलेला आहे.
१) बिहार २)हरियाणा ३) हिमाचल प्रदेश ४) झारखंड
५) पंजाब ६) उत्तर प्रदेश ७) पश्चिम बंगाल ८) उत्तरांचल
एकाही राज्याने धनगर या जातीस ST
चा दर्जा दिलेला नाही. खालील तीन राज्यांत धानगड (उरांव)
या जमातीस ST चा दर्जा आहे.
१) छत्तीसगड २) मध्यप्रदेश ३) महाराष्ट्र
या तिन्ही राज्यांत धांगड आणि धनगर अशा दोन
वेगवेगळ्या जातींची वेगवेगळ्या प्रवर्गात नोंद आहे. धांगड
या जमातीस तिन्ही राज्यांत ST, तर धनगर या जातीस
OBC अंतर्गत विशेष दर्जा म्हणून NT प्रवर्गात स्थान
देण्यात आले आहे.

हे कुणाच्याही लक्षात येईल की धानगड या जमातीस
या तीनही राज्यांत उरांव या जमाती बरोबरच हे आरक्षण मिळाले आहे. असे का असेल? कारण हे की धानगड हे उरांव या जमातीचेच दुसरे नाव आहे. त्यांच्या बोली भाषेचे नाव "कुडुख" असे आहे. "धांगड" या शब्दाचे इंग्रजी नाव Dhangad असेच होते. म्हणून ते धनगर ठरत नाही.
धनगरचे इंग्रजीत Dhangad असे लिहिले जात नाही. कारण इंग्रजीत नेहमी 'ड' चा 'र' होतो. 'र' चा 'ड' कधीच होत नाही. तरीही शंका असेल तर पुढील अहवालातील नोंद बघावी.
NATIONAL COMMISSION FOR DENOTIFIED,
NOMADIC AND SEMI-NOMADIC TRIBES
(MINISTRY OF SOCIAL JUSTICE &
EMPOWERMENT GOVERNMENT OF INDIA)
यांचा REPORT VOLUME – I, Dated JUNE 30,
2008
या अहवालात Observations and Suggestions
या सदरात पुढील नोंद क्रमांकावर असे नमूद केलेले आहे की,
5) (xii) At S.No.18 in Hindi, the community is
written as Dhangar, whereas in English it is
written as Dhangara.

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti