आदिवासी समाजावर पोलिसी हुकुमशाही दडप शाही चा महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटनांनी निषेध नोंदवा ………
अत्यंत जबाबदारी ने मी हे बोलतोय ….
याच कारण परभणी व नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील दोन घटनांनी हे दाखवून दिले आहे कि आदिवासी समाजावर या जिल्ह्यातील पोलिस यंत्रणांनी दडपशाही चालवली आहे …. परभणी मधील राष्ट्रवादी भवन आदिवासी वस्तीग्राहतील विद्यार्थ्यांनीफोडले या कारणामुळे कुठलीही शहानिशा न करता वस्तीग्र्हातील दिसेल त्या विद्यार्थ्यावर मारहाण करून गुन्हे दाखल केले ….
या बाबत आदिवासी प्रेकल्प अधिकारीकिवा वस्तीग्र्हा ग्रहपाल यांना पूर्व कल्पना किवा परवानगी घेणे गरजेचे आहे,अत्यंत गंभीर गुनेह्गार आहेत अशी वागणूक या मुलांना मिळाली…
माझा प्रेश्न आहे या यंत्रणेला तुम्ही गंभीर गुनेह्गाराला किवा राजकीय आंदोलकांना सुद्धा या प्रेकारची वागणूक देत नाही ती या पोलिसांनी शिकणाऱ्या आदिवासी मुलांना दिली …
दुसरी घटना या पेक्षा गंभीर असून आदिवासी संघटनांना विचार करण्यास व न्याय कुठे माघावा हाप्रेश्न तुमच्या समोर येणार आहे ….
भोकर जि . नांदेड येथील पाढूरणा संस्थेची आदिवासी आश्रम शाळा असून येथिल संस्थेचा मुजोर संस्थाचालक वारंवार मुलांना त्रास देत होता या बाबत सर्वन समक्ष व पोलिस समोर एका मुलीला धक्का सुधा दिला …
या बाबत पालक,समाजसेवक ,विद्याथी जाब विचारण्यास गेले असता लाठीमार झाला त्यातून दगडफेक झाली व काही पोलिसांना गंभीर दुखापत झाली ….
पण नंतर जी दडपशाही झाली त्यामध्ये समंदर वाडी व काही गावात जाऊन महिला व निष्पाप लोकांना अमानुष मार खावा लागला अजूनही कित्यक आदिवासी बांधव त्यांच्या गावामध्ये किवा शाळेतील मुले त्यांच्या शाळेमध्ये किवा घरी सुधा गेली नाही ….
माझ्या मित्रानो या गावकर्यांना तुमच्या सहकार्याची गरज आहे ते गावकरी पोलिसांच्या भीतीने जंगलात जाऊन लपले आहेत व प्रेचंड घाबरले आहेत ……
या घटनेचा निषेध आपण करावा व सर्वच जिल्ह्यांमधून आदिवासी संघटनांनी या विद्यार्थी तसेच गावकरी यांच्या मानसिक छ ळा बद्दल निवेदने पाठवावेत व मानवहक्क आयोगाकडे दाद माघावी व या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी ठरणाऱ्या अधिकार्यावर अनुसचीत जाती -जमाती कायद्यानुसार कार्यवाही व्हावी हि मागणी आपण शासनाकडे करावी हि माझी आपल्याला विनंती…।
यशवंत पावरा.शिरपूर
(आदिवासी कार्यकता )
No comments:
Post a Comment