Breaking News

अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?

अरे आदिवासी बांधवानो अजून किती पिढ्या या राजकीय झेंड्यांचे बळी पडणार आहात ?
राजकारण हे एक साधन आहे शासन चालवण्या साठी, आणि राजकीय पक्ष एक घटक. राजकीय क्षेत्रात कार्य करत असणाऱ्यांनी आदिवासी हित जपण्या साठी त्यांना जमेल त्या मार्गाने जो पक्ष विचार धारा आवडेल त्या मार्गाने प्रयत्न करावे आणि ज्यांना आवडेल त्यांनी सहकार्य करावे. आदिवासी हित जपणे हे आपले धेय्य आणि उदिष्ट असताना पक्ष/नेते/विचारधारा यांच्या नावाने आपले विभाजन का करावे ना?

एक आदिवासी म्हणून सगळ्यांना एक विनंती, आपल्या परिसरात आदिवासी समाजाच्या अस्तित्व साठी प्रामाणिक नेतृत्व निवडून दया. (एक संवेधानिक प्रथा म्हणून)… अन्यथा हजारो वर्ष पासून आपल्या आदिवासी समाजात परंपरेने असलेली लोकशाही जगाला आदर्श शिकवणारी आहे. तेथे सगळेच समान असतात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करता येते. न वयाची मर्यादा न जाती पातीची, सर्व समावेशाक आणि पारदर्शक म्हणून जगातील अनेक नामवंत आणि यशस्वी उद्योग समूह याचा अवलंब करीत आहेत. आणि दुर्दैवाने आज विविध पक्षांचे कार्यकर्ते आदिवासींना राजकीय स्वार्थासाठी आदिवासी समाजातील एकात्मता नष्ट करू पाहत आहेत.

आयुश (आदिवासी युवा शक्ती) परिवार कडून सगळ्यांना विनंती आहे आपले जे राजकीय विचार असतील ते ठेवा पण आपण आदिवासी समाज एक कुटुंब आहोत हि भावना जतन करूया !

 www.jago.adiyuva.in

No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti