Breaking News

आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे

आपण आदिवासींनी आता मनापासून विचार करायची गरज आहे. आपल्यांना आवडेल त्या राजकीय चळवळीशी जोडून तन मन धनाने आदिवासी समाजाच्या हिता साठी लढणे जरी योग्य असले तरी, सध्याची परिस्थिती लक्षात घेता जर सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय फायद्या साठी आदिवासी अस्तित्व नष्ट करण्याच्या मार्गावर असतील तर, आदिवासींनी इत्तारांचे झेंडे मिरवण्यात रक्त आटवन्या पेक्षा आदिवासी हिता साठी आदिवासींचा स्वतंत्र पक्ष का असू नये ?
८५ मतदार संघात आदिवासींची निर्णायक मते आहेत. २५ विधान सभा आणि लोकसभा मतदार संघ आपल्या साठी राखीव आहेत याचा नाक्कीच विचार करावा. सुरवातीला नक्कीच कठीण वाटेल पण जर सगळे आदिवासी एकत्र आलो तर नक्कीच आपल्या निम्म्या पेक्ष जास्त समस्या क्षणात सुटतील 


आता वेळ आहे आदिवासींनी आपले अभ्यासू, स्वाभिमानी, प्रामाणिक, आक्रमक, तडफदार, सामाजिक बांधिलकी असलेले नेतृत्व घडवण्याचेतुम्हाला काय वाटते नक्की कळवा.
Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti