आदिवासिंच्या सुसंस्कृत घरात घुसून त्यांच्या सुविधा लाटण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.आता इतर जाती आपण किती गरीब आहोत हे सिध्द करण्यास सरसावले आहेत. धनाचे आगर म्हणजे धनगर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते या स्पर्धेत राजकीय खेळी करून आपला हा डाव साधत आहेत. घुसखोर आता अगदी आदिवासिंच्या दारात उभे आहेत. पण दुर्दैव त्यांना दरवाजात रोखण्यास आदिवासी बांधव दुबळा ठरतोय. ऐन भादव्यागत निवडणुकिंच्या तोंडावर कोण कोणावर आपली भूक भागवत आहे हे सामान्य आदिवासींना काही समजत नाही. एक नक्की सरकारने तटस्थ भूमिका घेवुन आदिवासिंच्या हिताचा विचार राखला जावा असे आदिवासी म्हणणार हे नक्कीच....परंतू एका बाजुला धनगर आम्हीच धनवार....आम्हीच धनगड असा कांगावा करणार हे पण सत्य...!!!
भाजपाला राज्यात सत्ता मिळवायची आहे म्हनून ते यात आपली पोळी भाजणार म्हणून त्यांनी लागलीच धनगरान्ना पाठिंबा दिला. आदिवासिंच्या बाबतीत अगदी नकारात्मक भूमिका असणारा शिवसेना आदिवासिंच्या विरोधात जाणार हे माहीत होतेच.... ज्या मनसेच्या प्रमुखान्नी काही वर्षांपूर्वी आपल्या सभेत पिचड या आदिवासी आडनावाचा चिपाड म्हणून अवमान केला होता. आज तर त्यांच्या बाळाने धनगर आरक्षनास पाठिंबा दिला.
ज्यांनी शेतक-यांच्या नावाखाली नेहमीच लाचारीपणा केला असे शेट्टी आज नेहमीप्रमाणे आदिवासींना अक्कल शिकवू लागला. नुकत्याच झालेल्या निवडणुकितिल आपल्या पराभवाची पुनरावृत्ति होवू नये म्हणून कॉंग्रेस धनगर समाजाला आश्वासन देणार हे नक्की.....तसेही अजित बाबांना मधुकर पिचड यांचे खच्चीकरण करणे अपेक्षित होते.
काका-पुतण्यान्नि मतान्साठी धुळफेक करायचा नेहमीचा शब्द पाळला.
राजकीय व्यक्ति आपली पोळी भाजणार हे नक्की...
पण खरा आदिवासी आवाज कुठे आहे? पिचड, वळवी, पुरके, मोघे
पण खरा आदिवासी आवाज कुठे आहे? पिचड, वळवी, पुरके, मोघे
हेच आदिवासी आहेत का? बाकीचे बगळे कुठे गेलेत....
No comments:
Post a Comment