Breaking News

सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद

पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीच्या भिंती अस्पष्ट होत असताना फक्त सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद विनाकारण सूरु करून आदिवासी समाजाला वेठीस धरण्याचा जो किळसवाणा प्रकार मला दिसला तो बघून मला बालपणी आजी भीती दाखवायची त्या भोकाडिची आठवण झाली.

मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे.

आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.

राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.

आदिवासी आता जागा झाला आहे....नक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात घ्यावा लागेल.

प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्म....यातून देशाच्या विकासात आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून पुढे येईल.

सामाजिक स्वास्थ्य हे सर्वांच्या एकीवर अवलंबून असते. परंतु आजची ही राजकीय हरामी मंडळी या एकीवर कु-हाड चालवत आहेत. ज्यांनी सावरायला हवे तेच बोटं समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.

वास्तविक आरक्षण हा विषय या राजकारणी व्यक्तींचा नाहीच मुळी....तो लोकसभेच्या अखत्यारित आहे. हे माहीत असतानाही फक्त आणि फक्त सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यासाठी जणु काही हे नेते प्रयत्नशील आहेत.

परकीय शक्तिन्नी आपल्या देशात येवून एखादा खुप मोठा विनाशकारी प्रयत्न करावा या प्रकारचे कार्य काही नेते करत आहेत.

जंगलचा राजा म्हणजे आदिवासी.....आज जागा झालाय हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पण त्याने कुणाची शिकार करू नये असे वाटत असेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नये.

विद्रोही
आदिवासी संघर्ष


No comments:

Post a Comment

Designed By Published.. AYUSH | Adivasi Yuva Shakti